आनंदयात्रा
EVENT DETAILS
- START DATE: 2015-02-22
- START: 10:00 AM
- END DATE: 2015-02-22
- END: 07:00 PM
- LOCATION: Savarkar sankul ,shivaji Park,Dadar
ORGANIZER'S DETAILS
- ORGANIZED BY: CBD Foundation
- EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
- PHONE NO: 09820106500
‘आनंदयात्रा’ हा ‘सीबीडी फाऊंडेशनचा पाचवा कार्यक्रम शनिवार, २४ फेब्रुवारी २०१५ रोजी वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नववर्षाचे स्वागत, तसेच देशात आगामी काळात सुख, समृद्धी, विकास आणि प्रगती यांचे युग यावे ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस आणि माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे या दोघांनी ‘माझे जीवन : एक आनंदयात्रा’ असे सूत्र घेऊन या सोहळ्यात रंग भरला. या दोघांनी आपण राजकारणात कसे आलो आणि आपली वाटचाल कशी झाली याचे मोठे खुमासदार वर्णन केले. श्री. फडणवीस यांनी आपला विवाह कसा ठरला याचे आणि आतापर्यंतच्या वैवाहिक साहचर्याबद्दलचे खुससुशीत निवेदन केले. श्री. शिंदे यांनी आपले बालपण, शिक्षण, नोकरी, वकिली, राजकारणातील चढउतार, दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी कशी हुकली, राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रीपद आदींचा गोषवारा अगदी रोचक निवेदनातून मांडला.
फडणवीस यांना उद्देशून “पुढे जाताना मागे सुद्धा लक्ष असू द्या” असा प्रेमळ सल्ला शिंदे यांनी दिला. तो आपण कायम लक्षात ठेवू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
काव्य-शास्त्र-विनोद या त्रिसूत्रीवर आधारित “आनंदयात्रा” कार्यक्रम म्हणदे संगीत, काव्य-वाचन आणि नर्म विनोद यांची रेलचेल होती. महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, कलाकार आणि सादरकर्ते यात सहभागी झाले. रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांच्या बहारदार काव्यवाचनाने सांगता झाली. दीपक देशपांडे यांच्या नकला प्रचंड टाळ्या घेऊन गेल्या. निवडक गीते, प्रहसने, कविता यांच्या प्रसन्न वातावरणात प्रगल्भ रसिक जनांच्या सहवासात संपन्न होणारा हा मराठीतील असा पहिलाच कार्यक्रम होता.