दिव्यत्वाची येथे प्रचिती
EVENT DETAILS
- START DATE: 2017-04-30
- START: 10:00 AM
- END DATE: 2017-04-30
- END: 07:00 PM
- LOCATION: Savarkar sankul ,shivaji Park
ORGANIZER'S DETAILS
- ORGANIZED BY: CBD Foundation
- EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
- PHONE NO: 09820106500
‘सीबीडी फाऊंडेशन’ तर्फे रविवार ३० एप्रिल २०१७ रोजी आयोजित ‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’या कार्यक्रमात उत्तर प्रदेशाचे राज्यपाल श्री. राम नाईक प्रमुख पाहुणे होते. खासदार किरीट सोमय्या या प्रसंगी सन्माननीय अतिथी होते तर सारस्वत बँकेचे अध्यक्ष श्री. गौतम ठाकूर यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. दिव्यांग व्यक्ती करत असलेला संघर्ष उजागर करावा आणि त्यांच्यासाठी कार्य करत असलेले स्त्री-पुरुष प्रकाशात यावेत यासाठी हा खास कार्यक्रम शिवाजी पार्क येथील सावरकर संकुलात आयोजित करण्यात आला होता.
श्री. नाईक यांनी गेली तीन तपे कुष्टरुग्णांसाठी कार्य केले असून ही एक प्रकारची दिव्यांग सेवा आहे, अशा भावनेतून ‘सीबीडी फाऊंडेशन’ने त्यांना निंमत्रित केले होते. दिव्यांगांसाठी आणि त्यांच्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्या आणि त्यांना सक्षम करणार्या समाजसेवींचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आगळा वेगळा असून तो अत्यंत अनुकरणीय आहे, असे उदगार श्री. नाईक यांनी आपल्या भाषणात काढले. कार्यक्रमाची संहिता प्रसिद्ध लेखक-संपादक श्री. विजय कुवळेकर यांची होती तर संगीत संयोजन श्री. कौशल इनामदार यांचे होते. ‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’हा ‘सीबीडी फाऊंडेशन’चा सातवा कार्यक्रम. आठ अंध मल्लखांब पटूंच्या थरारक कसरती, पक्ष्यांसाठी घरटी बनवणारे आणि खास गोव्याहून आलेले मूक बधीर, व्हीलचेअर वरून मुंबईत सर्वत्र संचार करणारी सुपर्णा जोशी-शाह आणि तिला फुलासारखी जपणारे तिचे पती, आपले दिव्यांगत्व बाजूला ठेवून दिव्यांग स्त्री-पुरुषांसाठी काम करणारे डोंबिवलीचे विनायक मालवणकर आणि मनीषा दीक्षित, अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव भेट देऊन स्वावलंबी करणारे खासदार किरीट सोमय्या आदींच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी झाला. त्याचे निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि ‘सीबीडी फाऊंडेशन’चे एक संचालक प्रदीप भिडे यांनी केले. डॉ. सोमय्या म्हणाले की आपल्या संस्थेने आतापर्यंत अनेक दिव्यांगांना कृत्रिम अवयव देऊन स्वावलंबी केले असून नजीकच्या भविष्यात अशा दिव्यांगांची संख्या १००० वर नेण्याचा आपला निर्धार आहे
आपल्या छोटेखानी भाषणात श्री. गौतम ठाकूर म्हणाले की आपण हजर राहिलेल्या सामाजिक कार्यक्रमात ‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’ या कार्यक्रमाचे स्थान अगदी वेगळे राहील. सारस्वत बँक अशा उपक्रमांना निश्चित साहय्य करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.